हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांची पूजा केली जाते, त्यापैकी एक भगवान श्री कृष्ण,भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे.
धार्मिक ग्रंथंनुसार,भगवान श्रीकृष्ण हे १६ कलांनी परीपूर्ण असलेले एकमेव अवतार मानले जातात.
श्री कृष्णाच्या अनेक आवडत्या गोष्टींपैकी मोराचे पिसे आहे, जे तो आपल्या मुकुटात घालतात.
तुम्हाला माहित आहे का श्रीकृष्ण मोराची पिसे का लावतात? मोराची पिसे लावण्याची अनेक कारणे दिली जातात.
मान्यतेनुसार, एकदा राधा आणि राधाचे मोर कृष्णाच्या बासरीच्या तालावर नाचू लागले.
नाचत असतांना कृष्णाजवळ मोराची पिसे पडले आणि कृष्णाने ते उचलून डोक्यावर लावले, असे म्हणतात.
असे मानले जाते की, त्याच दिवसापासून कृष्णाने राधावरील त्याच्या अलौकिक प्रेमाचे प्रतीक म्हणून मोराची पिसे घालण्यास सुरवात केली.
भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोराची पिसे असण्याचे दुसरे कारण म्हणजे, कृष्णाचा भाऊ बलराम हा शेषनागाचा अवतार होता असे म्हणतात. साप आणि मोर एकमेकांचे शत्रू आहेत.
असे मानले जाते की, श्रीकृष्णाने डोक्यावर घातलेले मोराचे पिसे असे दाखविते की श्रीकृष्ण शत्रुंना सुद्धा विषेश स्थान देतो.
दुसऱ्या धर्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला कालसर्प दोष होता म्हणूनच त्यांनी मोराची पिसे नेहमी सोबत ठेवली.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.