स्मिता शेवाळेने का सोडली ‘मुरांबा’ मालिका?

By Harshada Bhirvandekar
Jun 12, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्री स्मिता शेवाळे सध्या मालिका विश्व गाजवत होती.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत स्मिता ‘जान्हवी’ ही ग्रे शेड भूमिका साकारत होती. 

मात्र, तिने नुकताच या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. या नंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.

परंतु, ‘मुरांबा’च्या ‘जान्हवी’ने म्हणजेच अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे.

स्मिताने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला असून याबाबतची माहिती तिने तिच्या युट्युब चॅनेलवरुन दिली आहे.

मुलगा कबीर खूप लहान असल्याने आणि त्याला सांभाळायला कोणीही नसल्याने, स्मिताने हा निर्णय घेतला आहे.

डेली सोपचे शूटिंग २०-२० दिवसांचं असतं आणि ते सध्या करणं मला शक्य नाही, असं स्मिता शेवाळे म्हणाली.

पहिलं प्राधान्य माझा मुलगा कबीर असल्यामुळे मला हे सगळं करताना काहीही वाटणार नाही, असं स्मिता म्हणाली.

मी मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे, त्यामुळे मालिकेतजी कोणी नवीन जान्हवी येइल तिला स्वीकारा, असही ती म्हणाली.

हुबेहूब आलिया भट्टची कॉपी आहे ‘ही’ अभिनेत्री!