रितेश देशमुखनं का स्वीकारलं ‘बिग बॉस मराठी ५’चं सूत्रसंचालन?

By Harshada Bhirvandekar
Jul 22, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस मराठी ५’ हा प्रेक्षकांचा आवडता शो असून, याच्या चारही सीझन्सना उदंड प्रतिसाद मिळाला होता.

आता सगळेच प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ची आतुरतेने वाट बघत आहेत. प्रेक्षकांना यावेळी अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

यंदा महेश मांजरेकर नाही, तर अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणार आहे.

नुकतीच ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये रितेश देशमुख यांनी हा शो आपण का स्वीकारला याचं कारण सांगितलं. 

रितेश देशमुख म्हणाला की, मी बिग बॉस मराठीचा पहिल्यापासूनच खूप मोठा चाहता आहे. 

आपल्या आवडीच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली नसली, तरी आपण त्याचा भाग होणार ही संधी कोण सोडणार...  

या शोचा भाग व्हायला मिळणार, त्यामुळेच मी या शोचं सूत्रसंचालन लगेच स्वीकारलं, असं रितेश देशमुख म्हणाला. 

इतकंच नाही, तर बिग बॉस मराठी ५साठी रितेश देशमुखने सध्या त्याच्या हातात असलेले अनेक प्रोजेक्ट पुढे देखील ढकलले आहेत.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री