का झालं होतं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप?

All Photo: @@sameer_gawde_photography/IG

By Harshada Bhirvandekar
May 08, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.  

आगामी चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक गोष्टी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील प्रेम आणि रिलेशनशिप याबाबत एका मुलाखतीत मत मांडलं होतं.

या मुलाखतीत प्राजक्ता माळी हिनं तिचा ब्रेकप झाल्याचं म्हणत त्याचं कारण देखील सांगितलं होतं.  

अभिनेत्री प्राजक्ता माळी लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. 

तर गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता माळी प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न देखील तिच्या चाहते सतत विचारताना दिसले. 

मात्र, या मुलाखतीत प्राजक्ता माळी तिच्या ब्रेकअप विषयी मोकळेपणाने बोलली. पाच-सहा वर्षांपूर्वी आपण एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याची कबुली तिने दिले. 

पुढे म्हणाली की, नंतर तिला कळलं की, तो व्यक्ती तिच्याशी खोटं बोलतोय आणि ही गोष्ट तिला पटली नाही.  

प्राजक्ताने त्याला त्याच्या खोटे बोलण्याचे पुरावे दिले. पण, तो ते स्वीकारायला तयार नव्हता आणि म्हणूनच तिने ब्रेकअप केला.  

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!