यशाच्या शिखरावर असताना मृणाल दुसानिसनं का केलं लग्न?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 15, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलं.

‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणालने लोकप्रियता मिळवली.

आपल्या अभिनयाने मालिकाविश्व गाजवणारी ही अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून सिनेविश्वपासून दूर आहे.

मृणालने २०१६ साली नीरज मोरेसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्ष तिने काम केले. 

मात्र मृणालचा नवरा हा कामानिमित्त अमेरिकेत राहत असल्याने ती देखील अमेरिकेला निघून गेली.

आयुष्यात करिअरच्या शिखरावर असताना मृणालने हा लग्न करण्याचा आणि लग्नानंतर मालिकाविश्वातून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या २८व्या वर्षी नीरज आयुष्यात आला आणि तो चांगला मुलगा वाटला, म्हणून लग्नाचा निर्णय घेतला असं मृणाल म्हणाली.

लग्नानंतरही मृणालने करिअर थांबवलं नव्हतं. ती भारतात राहून काम करत होती, तर नीरज तिकडे अमेरिकेत काम करत होता.

मात्र, काही वर्षांनी त्यांनी आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचे ठरवतं, कामातून ब्रेक घेऊन एकत्र राहिले.

पचन शक्ती बूस्ट करण्यासाठी चहामध्ये घाला हे मसाले!