दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेहमी मफलर का घालतात?

By Atik Sikandar Shaikh
Apr 26, 2023

Hindustan Times
Marathi

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गळ्यात नेहमीच राखाडी रंगाची मफलर असते.

अनेकदा उच्चस्तरीय बैठकांमध्ये सुद्धा केजरीवाल यांच्या गळ्यात मफलर घातलेली दिसते.

अत्यंत साधे कपडे घालणारा मुख्यमंत्री अशी केजरीवाल यांची देशभरात ओळख आहे.

दिल्लीत हिवाळ्यात हाडं गोठवणारी थंडी असते. त्यामुळं अशा वातावरणात उबदार मफलर घालणं फायदेशीर असतं, असा खुलासा केजरीवालांनी केला होता.

अरविंद केजरीवाल हे मूळ दिल्लीचे नाहीत. ते हरयाणाच्या सिवन्नी गावातील नागरिक आहे. त्यामुळं दिल्लीत आल्यानंतर मफलर घालण्यास सुरुवात केल्याचं ते सांगतात.

साधे कपडे आणि मफलर घातल्यामुळं त्यांच्यावर अनेकदा टीका केली जाते. परंतु त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या सात वर्षांच्या काळात कधीही पेहराव बदलला नाही.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून केजरीवालांचं नेतृत्व पुढे आलं. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाचा देशभरात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.

सोनाली कुलकर्णीचा नथीचा नखरा!

(Photo: @ sonalee18588/IG)