शिवलिंगावर का अर्पण केली जाते सुपारी? जाणून घ्या...

By Harshada Bhirvandekar
Jul 03, 2024

Hindustan Times
Marathi

भगवान शिवाला सनातन संस्कृती देवांचा देव ‘महादेव’ असे म्हणतात. याशिवाय त्यांना ‘भोले शंकर’ असेही म्हटले जाते. 

शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण केले, तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.  

पण असे म्हणतात की, शिवलिंगावर काही खास वस्तू अर्पण केल्यास त्याचा आपला जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होतो.  

यातील एक खास गोष्ट म्हणजे सुपारी. शिवलिंगावर सुपारी अर्पण केल्यावर अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया...  

धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाच्या वेळी सुपारी अर्पण केल्यास भगवान शिव भक्तांचे सर्व दुःख दूर करतात.  

जर, तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल, घरात पैसा टिकत नसेल, तर रुद्राभिषेकाच्या वेळी सुपारी अवश्य अर्पण करावी. 

यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते. तर आर्थिक समस्या ही दूर होतात. 

असे अनेकदा घडते की, लोक काही काम करतात, पण त्या कामात यश मिळत नाही आणि अडथळे निर्माण होतात.

अशा परिस्थितीत तुमचे बिघडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी शिवलिंगावर सुपारी अर्पण करावी. यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल.

आवळा खाण्याचे फायदे