कोण आहे आशा भोसले यांची नात जनाई?

By Harshada Bhirvandekar
Jan 28, 2025

Hindustan Times
Marathi

आज आम्ही तुम्हाला अशा सौंदर्यवतीविषयी सांगणार आहोत, जिचे सौंदर्य आजकाल प्रत्येकाच्या ओठावर आहे.

ही सौंदर्यवती सध्या एका क्रिकेटरसोबत तिचे नाव जोडले गेल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

ही सौंदर्यवती दुसरी कोणी नसून, ९१ वर्षीय आशा भोसले यांची नात २३ वर्षांची जनाई भोसले आहे. 

जनाई भोसले ही तिची आजी आशा भोसले यांच्यासारखीच गायिका आहे. 

तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये गाणी गायली आहेत.

जनाई भोसले लवकरच चित्रपटांमध्ये प्रवेश करून अभिनेत्री बनणार आहे.

तिचा पहिला चित्रपट 'छत्रपती शिवाजी महाराज' आहे, ज्याचे दिग्दर्शन संदीप सिंग करत आहेत.

सोशल मीडियावर जनाईची फॅन फॉलोइंग चांगलीच आहे. इंस्टाग्रामवर तिचे दोन मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत जनाई भोसलेचे नाव जोडले जात आहे.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay