मुंबईचा पहिला डॉन कोण होता ? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 10, 2024

Hindustan Times
Marathi

मुंबई आज सुरक्षित शहर असलं तरी एकेकाळी मुंबईत अँडरवर्ल्डची मोठी दहशत होती. 

या शहरानं अनेक गुंडांना मोठी प्रसिद्धी दिली. पण तुम्हाला माहिती आहे का की मुंबईचा पहिला डॉन कोण होता ? 

मुंबईच्या पहिल्या डॉनचे नाव हाजी मस्तान होते. चित्रपट 'वन्स अपॉन अ टाइम' मधील मुख्य पात्र हाजी मस्तान यांच्यावरून चित्रित करण्यात आलं होतं. 

हाजी मस्तान मूळचे तामिळनाडू असून तस्कर म्हणून १९६० ते १९७० च्या दशकात उदयास आले. 

हाजी मस्तान यांना मुंबईचे पाहिले अँडरवर्ल्ड डॉन असल्याचं मानलं जातं. मस्तान हे तस्करी, चोरी, खंडणी या सारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये सक्रिय होते. 

मुंबईत संघटित गुन्हेगारी सिंडीकेट स्वरूपात नावारूपाला येत असतांना हाजी मस्तान यांचा मुंबईचे डॉन म्हणून उदय होत होता. 

हाजी मस्तान यांनी अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहे. तसेच अभिनेते व अभिनेत्री यांची सुरक्षा देखील त्यांनी पाहिली आहे. 

यामुळे मस्तान यांची मुंबईवरील पकड आणखी मजबूत झाली. मात्र, यानंतर दाऊद इब्राहीम आणि छोटा शकिल या सारख्या गुन्हेगारांचा उदय झाला. 

हाजी मस्तान यांना मुंबईच्या संघटित गुन्हेगारीचा गॉडफादर देखील संबोधले जाते. हाजी मस्तान सारखा मुंबईवरील प्रभाव कोणताच डॉन दाखवू शकला नाही.   

घरच्या घरी व्हेज मेयोनीज कसं बनवाल?