कोण आहे ‘तारक मेहता...’चा नवा ‘गोली’? जाणून घ्या

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Aug 08, 2024

Hindustan Times
Marathi

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आता १६ वर्षांनंतर 'गोली'च्या रुपात नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

'गोली' साकारणाऱ्या अभिनेता कुश शहा याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'या मालिकेचा निरोप घेतला आहे.

आता त्याच्या जागी एका नवा अभिनेता गोली साकारणार आहे. त्याचे नाव धर्मित शहा आहे.

धर्मित शहाचा हा पहिलाच शो आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून तो छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

धर्मित हा दिसायला हुबेहूब कुशसारखा आहे. त्याच्या मित्रांनी त्याला मालिकेसाठी प्रोत्साहन दिलेय.

निर्माता असित कुमार मोदी यांनी स्वतः त्याची निवड केली आहे आणि त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना धर्मित म्हणाला की, 'मी या भूमिकेला १०० टक्के देणार आहे. पण माझी तुलना करू नका.'

कुश शहाची स्वतःची एक वेगळी स्टाईल होती. मी सुद्धा स्वतःची अशी खास ओळख निर्माण करेन, असे धर्मित म्हणाला.

धर्मित शहाने आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत नवा गोली म्हणून एन्ट्री केली आहे.

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik