कोण आहे सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा झहीर इक्बाल?

By Harshada Bhirvandekar
Jun 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सध्या चर्चेत आहे.

या महिन्यात २३ जून २०२४ रोजी दोघेही लग्न करू शकतात अशी बातमी आहे.

झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचे नाते २०२२मध्ये प्रकाशझोतात आले, जेव्हा दोघांनी सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त केले.

झहीर इक्बालचा जन्म १० डिसेंबर १९८८ रोजी मुंबईत झाला. तो सोनाक्षी सिन्हापेक्षा एक वर्षाने लहान आहे.

झहीरच्या वडिलांचे नाव इक्बाल रत्नासी आहे. ते ज्वेलरी व्यावसायिक आणि सलमान खानचे जुने मित्र आहेत. 

'भाईजान’नेच झहीर इक्बाल बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. झहीर इक्बालने २०१९मध्ये 'नोटबुक फिल्म'मधून पदार्पण केले.

याआधी तो २०१४मध्ये साहेल खान प्रॉडक्शनसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता.

सलमान आणि झहीर त्याच्या बहिणीच्या लग्नात भेटले होते. येथे त्याने झहीरला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिले.

झहीर आणि सोनाक्षीची पहिली भेट सलमान खानने घडवून आणली होती, त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

आवळा खाण्याचे फायदे