‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jun 22, 2024

Hindustan Times
Marathi

आता बिग बॉस ओटीटी ३ सुरू झाले आहे. या सीझनमध्ये दिसणारी शिवानी कुमारी कोण आहे? जाणून घेऊया...

शिवानी कुमारी एक कंटेंट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर तिचे ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर २.२७ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.

शिवानी उत्तर प्रदेशातील औरैया या छोट्या गावातील आहे. तिचे जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत गेले असून, ती गरिबीत जगली आहे.

प्रसिद्ध होण्यापूर्वी शिवानी टिकटॉक्स बनवायची. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती टिकटॉकवर प्रसिद्ध झाली.

शिवानी ज्या व्हिडीओद्वारे प्रसिद्ध झाली, त्यात ती चुकीचे इंगजी शब्द बोलली होती. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

तिचा व्हिडीओ इतका ट्रेंड झाला की, शिवानी कुमारी रीलमध्ये लोकप्रिय झाली. 

शिवानी कुमारीने तिच्या कंटेंटच्या कमाईतून घर आणि कार देखील खरेदी केली आहे.

शिवानीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या आईकडे तक्रार केली असता शिवानीला घरात मारहाण करण्यात आली होती. 

TikTok बंद झाल्यानंतर शिवानीने युट्युबवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली होती. 

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो