कोण आहे सेलेना गोमेझचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँको?
By
Harshada Bhirvandekar
Dec 13, 2024
Hindustan Times
Marathi
लोकप्रिय गायिका आणि गीतकार सेलेना गोमेझने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली.
सेलेना गोमेझ हिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंटची घोषणा करत आपलं नातं जगजाहीर केलं.
तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बेनीसोबत दिसली आहे.
सेलेना आणि बेनी ब्लँको २०२३ पासून एकत्र आहेत. डिसेंबरमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.
दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते.
आता सेलेनाने तिचा फोटो शेअर करून आपण अधिकृतरित्या एकत्र असल्याची जाहीर कबुली दिली.
सेलेनाचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँको हा एक अमेरिकन रेकॉर्ड निर्माता आणि गीतकार आहे.
वयाच्या सहाव्या वर्षीपासून त्याने संगीत क्षेत्रात नाव कमवायला सुरुवात केली. त्याने सेलेनासाठी देखील अनेक गाणी लिहिली आहेत.
या आधी सेलेना गायक जस्टिन बीबर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा