सीएसकेचा युवा खेळाडू समीर रिझवी IPL च्या मिनी ऑक्शनपासून चर्चेत होता. कारण त्याला CSK ने त्याच्यासाठी ८.४० कोटी रुपये मोजले होते.
आता समीर रिझवीची फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. समीरने GT विरुद्धच्या सामन्यात ६ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने राशीद खानला २ षटकार ठोकले.
AFP
अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवी हा उत्तर प्रदेशकडून खेळतो. २० वर्षीय समीर गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.
समीर रिझवीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११ लिस्ट-ए आणि ११ टी-20 सामने खेळले आहेत.
गेल्या वर्षीच्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये समीरने कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना १० सामन्यात ५०.५६ ची सरासरी आणि १८८ च्या स्ट्राइक रेटने ४५५ धावा केल्या.
AP
समीरने त्या स्पर्धेत २ शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर तो सर्वांच्या नजरेत आला.
समीर षटकार आणि चौकार मारण्यात माहीर आहे. यूपी टी-20 लीगच्या १० सामन्यांमध्ये समीरने ३८ चौकार आणि ३५ षटकार मारले होते.
ANI
त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही समीरने ७ डावात ६९.२५ च्या सरासरीने आणि १३९.९० च्या स्ट्राईक रेटने २७७ धावा केल्या होत्या.
त्यावेळी त्याच्या बॅटमधून १८ चौकार आणि १८ षटकार मारले होते. या स्पर्धेत समीरने २ अर्धशतके झळकावली होती.