प्रिया सरोज कोण आहे?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 17, 2025
Hindustan Times
Marathi
क्रिकेटपटू रिंकू सिंगने खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत साखरपुडा केला आहे.
पण प्रिया सरोजचे वडील आणि माजी खासदार तुफानी सरोज यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
तुफानी सरोज यांनी म्हटले की, या नात्याबाबत दोन्ही कुटुंबे गांभीर्याने विचार करत आहेत, मात्र सध्या तरी एंगेजमेंट झालेली नाही.
२५ वर्षीय प्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले.
प्रिया सरोज यांनी नोएडाच्या अमिटी विद्यापीठातून लॉची डिग्री मळवली. यानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूकीत लढवली.
प्रिया सरोज यांनी मच्छलीशहर मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते बीपी सरोज यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला.
प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत.
तुफानी सरोज सध्या समाजवादी पक्षाच्या तिकीटावर केरकट मतदारसंघातून आमदार आहेत.
तर २७ वर्षीय रिंकू सिंगने भारतासाठी २ वनडे आणि ३२ टी-20 सामने खेळले आहेत.
माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी
पुढील स्टोरी क्लिक करा