‘पिस्तुल क्वीन’ मनू भाकरचे १० ग्लॅमरस फोटो
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jul 29, 2024
Hindustan Times
Marathi
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळवले.
नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवणारी मनू पहिलीच महिला भारतीय खेळाडू आहे.
मनू भाकरची ही दुसरी ऑलिम्पिक आहे. याआधी तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केलं होतं.
टोकियोमध्ये १० मीटर एअर पिस्तुल फेरीत तिचे पिस्तुल तुटल्याने ती पदकापासून वंचित राहिली होती.
खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणामधील झज्जर येथे मनू भाकरचा जन्म झालाय.
शाळेय जीवनापासून मनूला खेळाची आवड होती. शाळेमध्ये मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग खेळायची
वयाच्या १४ व्या वर्षी मनूने नेमबाजीमध्ये करियर करण्याचा घेत वडिलांना पिस्तुल खरेदी करण्यास सांगितले.
गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे.
ब्युनास आयर्स २०१८ मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे.
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा