कोण आहे भगवान कल्की? कधी आणि कुठे अवतरणार?

By Harshada Bhirvandekar
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

‘गरुड पुराणा’नुसार भगवान विष्णूचे १० अवतार आहेत. यातील एक ‘कल्की’ हा अवतार अजून पृथ्वीवर अवतरीत व्हायचा आहे.  

धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा अधर्म शिखरावर असेल, तेव्हा भगवान विष्णू धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ‘कल्की’ अवतारात पृथ्वीवर प्रकट होतील.  

पण, भगवान विष्णूचा कल्की अवतार केव्हा आणि कुठे अवतरणार हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..  

मत्स्यपुराणात भगवान विष्णूच्या कल्की अवताराचे वर्णन केले आहे. हा अवतार कलीयुग आणि सत्ययुगाच्या संगमाने होणार आहे.  

पुराणानुसार, भगवान विष्णूचा दहावा अवतार अर्थात कल्की देव याचा जन्म संभल गावात होणार आहे. संभल गाव ओरिसा आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही भागांमध्ये आहे.  

धार्मिक ग्रंथानुसार, भगवान विष्णूचा अवतार असणारा कल्की पांढऱ्या घोड्यावर बसून राक्षसांचा नाश करेल. 

त्याच्या घोड्याचे नाव देवदत्त असेल. तो या जगातून पापी लोकांचा नाश करून, धर्माची पुनर्स्थापना करेल.  

कल्की नावाचे एक पुराण देखील आहे. विष्णूयाशा नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की अवतार जन्माला येईल, असे त्याच म्हटले आहे.  

मात्र, या काळातही कल्की देवाची मंदिरे ही बांधण्यात आली आहेत, जिथे कल्कीची आरती केली जाते.

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!