ही आहे बिस्माह मारूफ. पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार. जाणून घेऊ तिची कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल...

Bismah Maroof IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 20, 2023

Hindustan Times
Marathi

हरमनप्रीत जशी भारतात लोकप्रिय आहे, तसेच बिस्माहचे तिच्या देशात असंख्य चाहते आहेत.

Bismah Maroof IG

बिस्माह मारूफ ही पाकिस्तानातील स्टार महिला क्रिकेटर आहे. 

Bismah Maroof IG

बिस्माह मारूफ तिच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ती मितभाषी आहे.

Bismah Maroof IG

बिस्माहनं २८ नोव्हेंबर २०१८ रोजी अबरार अहमदशी लग्न केलं. अबरार हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बिस्माहशी निकाहानंतर तो प्रकाशझोतात आला. बिस्माहची वैयक्तिक संपत्ती अबरारपेक्षा जास्त आहे.

Bismah Maroof IG

बिस्माहला एक मुलगी आहे. ती अनेकदा आपल्या मुलीला क्रिकेट टूरवर घेऊन जाते. एका सामन्यानंतर भारतीय संघानेही पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराच्या मुलीचे लाड केले होते.

Bismah Maroof IG

बिस्माह मारूफने पाकिस्तानसाठी १२३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तिनं ३१०९ धावा केल्या आहेत. यात १८ अर्धशतकांचा समावेश आहे. तिनं ४४ बळी घेतले आहेत.

Bismah Maroof IG

बिस्माहनं १२९ सामने खेळले आहेत आणि २५३७ धावा केल्या आहेत. टी-ट्वेंटीमध्ये तिनं ३६ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Bismah Maroof IG

बिस्माह मारूफ फिटनेस फ्रीक मानली जाते. ती जिम सेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Bismah Maroof IG

विद्यार्थ्यांनी आवर्जुन बघाव्या या नेटफ्लिक्स सिरीज

Pexels