लंकेशाला कुणी दिले ‘रावण’ हे नाव?

By Harshada Bhirvandekar
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

लंकाधिपती रावण सखोल ज्ञानी होता हे खरे आहे, पण त्याच्या अहंकारामुळेच त्याचा सर्वनाश झाला.

लंकाधिपती रावणाशी संबंधित अनेक कथा आहे, त्याच्या नावाबाबत ही अशीच एक कथा आहे.  

लंकेशाला रावण हे नाव कोणी दिले आणि या नावाचा अर्थ काय आहे, तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..

पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने लंकेच्या शासकाला ‘रावण’ हे नाव दिले.  

रावणाला भगवान शिवाला कैलासहून लंकेत आणण्याची इच्छा होती. परंतु, जेव्हा भगवान शिव राजी झाले नाहीत, तेव्हा रावणाने कैलास पर्वत उचलण्यास सुरुवात केली.  

तेव्हा भगवान शिवाने आपला एक पाय कैलास पर्वतावर ठेवला, ज्यामुळे रावणाची बोटं चिरडली.  

त्यावेळी रावण वेदनेने ओरडला आणि भगवान शिवाकडे क्षमा मागू लागला. याच काळात त्याने शिवतांडव रचले.

भगवान शिवाला हे खूपच विचित्र वाटले की, वेदना होत असतानाही तो शिवाची स्तुती गात होता. म्हणूनच महादेवाने त्याचे नाव ‘रावण’ ठेवले. 

‘रावण’ या नावाचा अर्थ असा आहे, जो मोठ्याने गर्जना करतो.

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?