पांढऱ्या संगमवर दगडापासून ताजमहालची बांधणी करण्यात आली आहे. ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत असतात.
ताजमहाल शहाजानने त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत तयार केला होता.
ताजमहाल बांधण्यासाठी १६ वर्षांचा कालावधी लागला. वर्ष १६३२ मध्ये ताजमहाल उभारण्याची सुरुवात करण्यात आली होती. तर वर्ष १६४८ मध्ये ताजमहाल बांधून तयार करण्यात आला होता.
ताजमहालला मुगल वास्तु कलेचा उत्कृष्ट नमूना समजलं जात. ताजमहालला १९८३ मध्ये यूनेस्कोच्या जागतिक धरोहर या यादीत समाविष्ट करण्यात आलं.
पण नेमकं ताजमहालचं डिझाईन कुणी तयार केलं होतं ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू शकतो. ताजमहालची रचना नेमकी कुणी केली, या बाबत माहिती घेऊयात.
यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटनुसार उस्ताद अली अहमद लाहोरी हे ताजमहालचे मुख्य वास्तुशिल्पकार होते. त्यांचा जन्म साल १५८० मध्ये लाहोर येथे झाला होता.
ते मुगल साम्राज्याचे मुख्य वास्तुशिल्पकार होते. त्यांनीच ताजमहालचं डिझाईन तयार केलं होतं.
एवढंच नाही तर उस्ताद अली लाहोरी यांनी लाल किल्ल्याचे देखील डिझाईन तयार केलं होतं. ते या वास्तु शिल्पाचे मुख्य डिझायनर होते.