दुर्गेच्या पूजेत या तेलाचा दिवा लावा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते. 

नवरात्रीच्या ९ दिवसांत माँ दुर्गेच्या ९ रुपांची पूजा केली जाते. असे केल्याने भक्तांना मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. 

वास्तूशास्त्रात दिशांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. यामुळे नवरात्रीत पूजा करताना दिवा कोणत्या दिशेला ठेवावा, तेल कोणते वापरावे? याला महत्व आहे.

नवरात्रीच्या काळात तुपाचा दिवा नेहमी माता राणीच्या उजव्या हाताकडे म्हणजेच तुमच्या डाव्या हाताकडे ठेवावा. 

यानंतर जर तिळाच्या तेलाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या डाव्या हाताला म्हणजेच, तुमच्या उजव्या हाताकडे ठेवावा.

वास्तूनुसार, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एक किंवा दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. यामुळे घरातील वास्तूतील अग्नि तत्व मजबूत होते.

दिवा पूर्व दिशेला ठेवा

दिवा ठेवण्याची योग्य दिशा पूर्व मानली जाते. पश्चिम दिशेला दिवा ठेवल्याने अनावश्यक खर्च वाढतो. तर पितरांसाठी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो.

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels