सकाळी जमिनीवर पाय ठेवताना कोणता मंत्र म्हणावा?
By
Priyanka Chetan Mali
Dec 20, 2024
Hindustan Times
Marathi
सकाळ आणि संपूर्ण दिवस शुभ बनवण्यासाठी अनेक पंरपरा पूर्वीपासून चालत आले आहे.
नेहमी लोकं सकाळी उठता बरोबर पहिले हात जोडून नमस्कार करतात आणि नंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी धरतीमातेला नमस्कार करतात.
त्यामुळे सकाळी उठतांनाच जमिनीवर पाय ठेवताना कोणता मंत्र म्हणावा जाणून घ्या.
सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवताना म्हणा हा मंत्र - समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।
अर्थ असा आहे की, समुद्ररुपाने वस्त्रे परिधान करणारी, पर्वतासारखी स्तने असलेली आणि भगवान श्रीविष्णूची पत्नी भूमिदेवी, मी तुला नमस्कार करतो.
या मंत्रातून भूमिदेवीची कृतज्ञता व्यक्त केली असून, क्षमाप्रार्थना केली आहे. कारण आपण उठल्यावर जमिनीवर पाय ठेवणार असतो.
मान्यतेनुसार भूमिला देवी मानले गेले आहे आणि सकाळी आपण जेव्हा भूमिवर पाय ठेवतो तेव्हा आपल्याला दोष लागतो.
या दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून पाय ठेवण्याआधी भूमिदेवीची क्षमा मागण्याची ही परंपरा आहे.
क्षमाप्रार्थना केल्याने आपल्याला देवीची कृपा लाभते, सुख-शांती प्राप्त होते, सकारात्मकता वाढते, आणि बळ मिळतं.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा