समुद्रावर तयार करण्यात आलेला जगातील सर्वात लांब पूल कोणता ?
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 16, 2024
Hindustan Times
Marathi
जगात अशी अनेक मोठी बांधकाने आहेत जी इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमूना आहेत. या पैकी चींनमधील हाँग काँग झुआई मकाऊ पूल आहे.
हा पूल समुद्रावर बांधण्यात आलेला जगातील सर्वाधिक लांब पूल आहे. या पूलाची लांबी ही ५५ किलोमीटर आहे.
हा पूल बांधण्यासाठी चीनला तब्बल ९ वर्ष लागली. २००९ मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. या पुलाचे काम हे २०१८ मध्ये पूर्ण झाले.
हा पूल तयार झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. दळण वळण अधिक वेगवान झाले आहे. या पूर्वी चीनमधून हाँग काँग येथे जायला तीन तास लागत होते.
हा पूल तयार झल्यावर हाँग काँग येथे केवळ ३० मिनिटांत पोहचता येतं.
मीडिया रिपोर्टनुसार समुद्रावर बांधण्यात आलेला या पूलासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला.
हा पूल बांधण्यासाठी चीन सरकारने तब्बल १६.८ बिलियन डॉलर्स म्हणजेच ११ हजार कोटी रुपये खर्च केले.
पूल तयार करण्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे २२.९ किमी लांब आणि ६.७ किमीचा बोगद्यात रस्ता बांधण्याचे काम होते.
हा पूल बांधण्यासाठी चीनने समुद्रात अनेक कृत्रिम बेट तयार केली.
हा पूल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे कितीही तीव्रतेचा भूकंपाचे धक्के सहन करू शकतो. या पुलावर समुद्राच्या लाटांचाही कोणताही परिणाम होत नाही.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा