भगवान शंकराला कोणती फुलं प्रिय? जाणून घ्या...
By Harshada Bhirvandekar
Apr 29, 2024
Hindustan Times
Marathi
असं म्हणतात की भगवान शिव हा एकमेव देव आहे, जो आपल्या भक्तांच्या पूजेने सगळ्यात लवकर प्रसन्न होतो.
परंतु, त्यांची पूजा योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
भगवान शंकराच्या पूजेत त्यांना आवडणाऱ्या फुलांचा समावेश असावा. पण, तुम्हाला माहित आहे का भगवान शंकराला कोणती फुले आवडतात?
कणेरीचे फुलं भगवान भोलेनाथाला खूप आवडतात. दर, सोमवारी शंकराला कणेरीचे फुलं अर्पण केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.
असे मानले जाते की, ही फुलं भगवान शंकराच्या पूजेमध्ये अर्पण केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळतो.
असे मानले जाते की, भगवान शंकराला शमीची आणि बेलाची फुलं देखील खूप आवडतात.
विशेषतः भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरा रंगाची छोटी फुलं अर्पण केली जातात, या फुलांना ‘मंदार’ फुलं असेही म्हणतात.
याशिवाय भगवान शिवाला अगत्स्य, पारिजात आणि मोगऱ्याची फुलं खूप आवडतात.
वेदांमध्ये असा उल्लेख आहे की, मोगऱ्याच्या फुलाने शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा