चांदी खरेदी करण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो?
By
Priyanka Chetan Mali
Jan 21, 2025
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात चांदीला फार महत्व आहे. ज्योतिष शास्त्रात चांदीला शुभ धातू मानलं जातं.
चांदीचा वापर फक्त दाग-दागिन्यातच नव्हे तर पूजेच्या वस्तूतही होतो. चांदीला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मान्यतेनुसार शुभ दिवशी आणि मुहूर्तावर चांदी खरेदी केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते.
ज्योतिषशास्त्रानुसार चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणता दिवस शुभ असतो ते जाणून घेऊया.
अक्षय्य तृतीया, धनतेरस, पौर्णिमा किंवा शुभ नक्षत्रात चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते.
चांदीच्या धातुचा काही सामान खरेदी करण्यासाठी पुष्य नक्षत्राला फार शुभ मानलं जातं.
पुष्य नक्षत्रात चांदीचा सामान खरेदी केल्याने घरात धन-धान्याची वृद्ध होते आणि लाभ मिळतो.
पुष्य नक्षत्रात चंद्राची स्थिती फार प्रभावी असते आणि या दरम्यान चांदीची खरेदी केल्याने आर्थिक स्थिती स्थिर राहते.
ज्योतिषीय मान्यतेनुसार गुरु ग्रहाला धन, ज्ञान आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. अशात गुरुवारच्या दिवशी चांदी खरेदी करणे फार शुभ मानले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा