ऐश्वर्या रायला कोणता अभिनेता आवडतो?

By Harshada Bhirvandekar
Jun 17, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध असलेली ऐश्वर्या राय हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  

लोक अनेकदा गुगलवर ऐश्वर्याच्या आवडत्या गोष्टी शोधत असतात. चला तर, जाणून घेऊया अभिनेत्रीचा आवडता अभिनेता कोण आहे?  

Enter text Here

ऐश्वर्या रायने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिचे चित्रपट हिट ठरले आहेत. तिने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.  

ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल सांगितले होते. ऐश्वर्या रायचा आवडता अभिनेता तिचा पती म्हणजेच अभिषेक बच्चन आहे.  

ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती.  

‘ढाई अक्षर प्रेम के’ हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली.  

२००३मध्ये त्यांचा ‘कुछना कहो’ हा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर दोघांनी ‘धूम २’, ‘उमराव जान’, ‘गुरु’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले.  

अभिषेकला ऐश्वर्या राय आवडू लागली होती आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत त्याने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.  

२००७मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला आणि २० एप्रिल रोजी त्यांचे लग्न पार पडले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लाडकी लेक आराध्या बच्चन हिचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ रोजी झाला.

शिकवणी घेऊन केला UPSCचा अभ्यास! कठोर मेहनतीच्या जोरावर बनली IPS