पूजा किंवा शुभ कामात कोणत्या ९ पानांचा होतो वापर?

By Priyanka Chetan Mali
Dec 15, 2024

Hindustan Times
Marathi

श्वास घ्यायला ताजी हवा गरजेची असते. यामुळे निसर्गाने आपल्याला झाडं दिली आहे. हिंदू धर्मात झाडांना आणि त्यांच्या पानांना फार महत्व आहे.

आज जाणून घेऊया ९ पानांविषयी, ज्यांना पवित्र मानून पूजा किंवा शुभ कार्यात त्यांचा वापर केला जातो.

तुळस - हिंदू धर्मात देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळशीचे पान ठेवले जाते.

बेलपान - महादेवाची पूजा बेलपानाशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यांच्या पूजेत बेलपत्राला फार महत्व आहे.

केळ्याचे पान - हिंदू धर्मात केळ्याचे पान फार पवित्र मानले गेले आहे. पूजा-पाठा दरम्यान केळ्याचे पानही विविध पद्धतीने वापरले जाते.

पिंपळाचे पान - हनुमानाला जय श्रीराम लिहून पिंपळाच्या पानांची माळ अर्पण केली जाते.

शमीचे पान - हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार शनिदेवाला शमीचे पान अर्पण केल्याने शनि दोष दूर होतो. तसेच गणपती बाप्पाला शमीचे पान अर्पण केल्याने बुद्धी तेज होते.

रुईचे पान - प्रत्येक शनिवारी रुईच्या पाना-फुलांची माळ करून हनुमानाला अर्पण केली जाते. 

विड्याचे पान - हिंदू धर्मात पूजा-पाठा दरम्यान विड्याचे पान वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जाते. देवी देवतांना विड्याच्या पानातच सुपारी, कपूर आण लवंग टाकून अर्पण केले जाते.

आंब्याचे पान - सण-उत्सवात किंवा शुभ कार्यात आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. पूजेतही आंब्याच्या पानांचा वापर केला जातो.

वडाचे पान - वडाचे पानही फार शुभ मानले जाते. हनुमानाच्या पूजेत वडाच्या पानांचा वापर होतो.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा