कधी आहे राम नवमी? जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व!

By Harshada Bhirvandekar
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात रामनवमी या सणाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

चैत्र नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला.

म्हणूनच हा दिवस ‘राम नवमी’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी कधी आहे राम नवमी? जाणून घेऊया...

यावर्षी म्हणजे २०२४मध्ये १७ एप्रिल रोजी राम नवमी साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्रीची समाप्तीही याच दिवशी होणार आहे.

या दिवशी मंदिरांमध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जातो आणि राम भजने गायली जातात.

पंचागानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी १६ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १.२३ मिनिटांनी सुरू होईल.

तर, दुसऱ्या दिवशी १७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.१४ मिनिटांनी ही तिथी संपणार आहे.

पुराणानुसार, श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार आहेत. रामनवमीला रामाची पूजा केल्याने कीर्ती आणि वैभव प्राप्त होते.

नवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी अर्थात राम नवमीच्या दिवशी हवन करायला विसरू नका.

शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Instagram