श्रेया बुगडे हिनं कधी केली करियरची सुरुवात?

By Harshada Bhirvandekar
Jun 24, 2024

Hindustan Times
Marathi

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे 'ड्रामा ज्युनियर्स'च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

श्रेयाने आपल्या नवीन प्रवासाच्या वाटचाली बद्दल व्यक्त होताना सांगितले, ‘मी पुन्हा एकदा रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, पण एका नवीन रूपात.’

श्रेया बुगडे 'ड्रामा ज्युनियर्स'मध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला लहान मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. 

श्रेया म्हणाली की, ‘हे माझ्यासाठी नवीन आव्हान आणि अनुभव असणार आहे. आशा आहे की, प्रेक्षक मला पाठिंबा देतील.’

श्रेयाने स्वतः बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. तिला लहान मुलांबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे.

श्रेया बुगडे म्हणाली की, ‘मी जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा मी ८ वर्षांची होते. त्यामुळे मी त्यांच्यातलीच एक आहे, असं मला वाटतं.’

श्रेया म्हणाली, त्यावेळी आम्हाला इतक्या सुविधा नव्हत्या. आमच्या आणि आमच्या पालकांच्या संघर्षाची पद्धत वेगळी होती. 

पण, आता काळ बदलला आहे आणि स्पर्धकांच्या कलेला अशी संधी मिळणं खूप महत्वाचं आहे.  

या नव्या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर परीक्षक असणार आहेत, तर श्रेया सूत्रसंचालन करणार आहे.

रश्मिका मंदानाच्या हॉट अदा पाहिल्या का ? नजर हटणार नाही!