आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये?

By Harshada Bhirvandekar
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

आषाढ हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे. या महिन्याला खूप महत्त्व आहे.

पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ नक्षत्रांवरून या महिन्याचे नाव पडले आहे. या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र दोन नक्षत्रांमध्ये असते.

आषाढ महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि उपवास येतात. त्यामुळे या महिन्यात काही गोष्टी करणे टाळले पाहिजे.

आषाढ महिन्यात रोज ब्राह्म मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी आणि ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा.

आषाढ महिन्यात दान, यज्ञ, व्रत, देव आणि पितरांची पूजा केल्याने सुख प्राप्ती होते.

या महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. पैसे, कपडे, छत्री, पाणी, धान्य इत्यादी गोष्टी दान कराव्यात.

आषाढ महिन्यात वांगी, मसूर, कोबी, लसूण, कांदा या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. 

आषाढ महिन्यात पालेभाज्या खाऊ नयेत. तसेच तेलकट पदार्थ टाळावेत. या महिन्यात राग, अहंकार, गर्व दूर ठेवा.

या महिन्यात कुणाचाही अपमान करू नका. घरी येणाऱ्या कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नये.

वास्तू दोष दूर करण्याचे ‘हे’ ७ सोपे उपाय!