नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर काय अर्पण करावे?

By Harshada Bhirvandekar
Aug 07, 2024

Hindustan Times
Marathi

श्रावण महिन्यात अनेक सण-उत्सव येतात. यापैकीच एक सण म्हणजे नागपंचमी.

नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि नाग देवता यांची पूजा केली जाते.

या खास दिवशी भगवान शिवावर म्हणजेच शिवलिंगावर काय काय अर्पण करावे, हे जाणून घेऊया...

नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. हे भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. यामुले सौभाग्य प्राप्त होते.

जीवनात येणाऱ्या अडचणीही दूर होतात. म्हणून नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा.

जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल, तर या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

मध हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

शिवलिंगावर मध अर्पण केल्याने यश मिळते आणि मनुष्य निरोगी राहतो.

शिवलिंगावर धोत्रा अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. 

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!