अंतराळात कृत्रिम उपग्रहाचा फिरण्याचा वेग किती असतो ? जाणून घेऊयात.

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

अंतराळात मानवाने पाठवलेले शेकडो कृत्रिम उपग्रह फिरत आहेत. काही पृथ्वीच्या कक्षेत तर काही पृथ्वीच्या दूर इतर ग्रहांच्या अवती भवती फिरत आहेत. 

पण कधी तुम्ही विचार केला आहे का की अंतराळात मानवाने पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांचा फिरण्याचा वेग किती असतो? 

जर अर्थ ऑब्झरव्हेशन सॅटॅलाइट बदल बोलायचे झाल्यास हे सॅटॅलाइट पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये फिरतात. 

या वेळी या उपग्रहाचा वेग हा किमान २९ हजार किलोमीटर प्रतीतास येवढा असू शकतो. 

भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून तब्बल ३६००० हजार किमी उंचीवर फिरत असतात. 

तर पृथ्वीच्या कक्षेबाहेर फिरणाऱ्या उपग्रहाचा वेग हा वेगवेगळा असू शकतो. 

जर सर्वात वेगवान सॅटॅलाइट पारकर सोलर प्रोब बदल बोलायचे झाल्यास, हा उपग्रह ६ लाख ६४ हजार ८४ किमी प्रतितास वेगाने  फिरला आहे. 

म्हणजेच पारकर सोलर प्रोब हा उपग्रह विजेच्या दुप्पट वेगाने अंतराळात फिरलेला आहे. 

रेल्वे इंजिंनच्या डिझेल टँकची क्षमता किती? १ लीटर डिझेलमध्ये किती दूर धावते रेल्वे?