जगातील सर्वाधिक उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तैनात असणाऱ्या जवानांना किती मिळतो पगार ?
By
Ninad Vijayrao Deshmukh
Apr 26, 2024
Hindustan Times
Marathi
सियाचीनला जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी म्हटले जाते.
सियाचीनवर भारताचे नियंत्रण आहे. या ठिकाणी तब्बल पाच हजार सैनिक तैनात आहेत.
सियाचीन संपूर्ण वर्षभर बर्फाच्छादित असतं. या ठिकाणी शून्यापेक्षा कमी म्हणजेच उणे 30 ते 55 डिग्री सेल्सिअस तापमान असतं.
अशा स्थितीत देशांच्या सीमांचे रक्षण करणे जिकरीचे काम असते.
येथे तैनात असणाऱ्या सैनिकांना अनेक प्रकारचे भत्ते दिले जातात. ज्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होते.
सियाचीनमध्ये तैनात असणाऱ्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत भत्ता मिळतो.
अहवालानुसार लष्करातील सैनिकाला २५ हजार बेसिक पगार मिळतो. तर लेफ्टनंट जनरलला १ लाख ८२ हजार ते २ लाख २४ हजार १०० रुपये ऐवढा असतो.
या पगारा व्यतिरिक्त अनेक भत्ते जोडले जातात. त्यात सियाचीन भत्याचा देखील समावेश आहे.
काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...
पुढील स्टोरी क्लिक करा