मारुती सुझुकी स्विफ्ट कार ही सीएनजी व्हेरीयंटमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये काय फीचर दिले याची माहिती घेऊयात.
सीएनजी स्विफ्टचा ही एक किलो सीएनजी गॅसवर ३२.८२ किमी मायलेज देते. या कारमध्ये १.२ लिटरचे जी सिरिज ड्युयल वीवीटी इंजन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन ६९.७५ पीएसचा पॉवर व १०१.८ चा पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.
मारुती सुझुकी सीएनजी स्विफ्ट कारचे तीन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत किती आहे ? याची माहिती घेऊयात.
स्विफ्टच्या VXI (O) CNG 5 MT व्हेरीयंटची एक्स शो रूम किंमत ही ८,१९,५०० रुपये आहे. तर स्विफ्टच्या VXI (O) CNG मॉडेलची एक्स शो रूम किंमत ही ८,४६,५०० रुपये आहेत.
स्विफ्टच्या ZXI CNG 5 MT व्हेरीयंटची एक्स शो रूम किंमत ही ९,१९, ५०० रुपये एवढी आहे. मारुती सुझुकी न्यू जनरेशन स्विफ्ट सीएनजीच्या सर्व व्हेरीयंटमध्ये ५ स्पीड मॅन्यूयल ट्रान्समिशन मिळतं
या गाडीत सुझुकी कनेक्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी विंड, वायरलेस चार्जर, तसेच ७ इंचीचा स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेंटमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. या सोबतच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी प्रोग्राम, ६ एयरबॅग, हिल होल्ड असिस्ट आणि ६०:४० स्प्लिट रिअर सीट देण्यात आल्या आहेत.