पद्म पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कारांची घोषणा गणतंत्र दिवसाच्या एक दिवसाआधी केली जाते.
पद्म पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिले जातात. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री.
पण तुम्हाला माहिती आहे का हे तिन्ही पुरस्कार एकमेकांची कसे वेगळे आहेत ? चला तर या विषयी माहिती घेऊयात.
पद्म विभूषण भारतातील दूसरा सर्वात मोठा व मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात १९५४ रोजी करण्यात आली. त्यावेळी फक्त ६ जणांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
पद्म भूषण हा भारतातील तिसरा सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारापूर्वी भारत रत्न व पद्म विभूषण या पुरस्काराचा क्रमांक लागतो.
या पुरस्काराची सुरुवात १९५४ मध्ये करण्यात आली. त्यावेळी २३ जणांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या सोबतच विशिष्ट सेवेसाठी देखील पद्मश्री दिला जातो.
हा पुरस्कार देण्यासाठी जात, धर्म, पैसा, लिंग, अशा प्रकारे भेदभाव केला जात नाही.
डॉक्टर तसेच वैज्ञानिक यांच्या व्यतिरिक्त पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग या सरकारी स्वामित्व असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जात नाही.