एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे प्रवास सोईचा आणि आरामदाई ठरतो.
देशाच्या कानाकोपऱ्यात आज रेल्वे सेवा पोहोचली आहे. यामुळे तुम्ही रेल्वेने कधी ना कधी प्रवास हा केलाच असेल.
पण तुम्हाला माहिती आहे का एक्सप्रेस ट्रेन आणि सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनमध्ये काय फरक असतो ? आज तुम्हाला या बाबत माहिती देणार आहोत.
अस म्हटलं जात की भारतात एक्सप्रेस रेल्वे सेवा ही सेमी प्रायव्हेट सेवा मानली जाते. माहितीनुसार एक्सप्रेस ट्रेन ही ५५ किमी किंवा त्या पेक्षा जास्त प्रतीतास वेगाने धावत असते.
एक्सप्रेस ट्रेनचा वेग हा मेल ट्रेनपेक्षा अधिक असतो. मात्र, सुपरफास्ट एक्सप्रेस पेक्षा या गाड्यांचा वेग हा कमी असतो.
एक्सप्रेस ट्रेनचे नाव शहर, जागा किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावावर देखील असू शकतं. या गाड्यांमध्ये एसी, स्लीपर किंवा जनरल डब्बे असतात.
सुपरफास्ट एक्सप्रेसचा वेग प्रतितास हा ११० किमी असतो. तर या गाड्यांच्या थांब्याची संख्या देखील मर्यादित असते.
एक्सप्रेस ट्रेन पेक्षा सुपरफास्ट एक्सप्रेसचे भाडे हे सर्वाधिक असते. यात देखील जनरल, स्लिपर आणि एसी डब्बे असतात.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री