रेल्वे इंजिंनच्या डिझेल टँकची क्षमता किती? १ लीटर डिझेलमध्ये किती दूर धावते रेल्वे? 

By Ninad Vijayrao Deshmukh
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय रेल्वे जगतातील चौथी सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रोज करोडो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

भारतीय रेल्वेत सध्या डिझेल आणि वीज या दोन्ही वर धावणारे इंजिन आहेत. 

देशातील रेल्वे ट्रॅकचे पूर्णपणे विद्युतीकरण झाले नसल्याने काही रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनवर रेल्वे सेवा सुरू आहे. 

पण, तुम्हाला माहिती आहे का ? रेल्वेच्या डिझेल इंजिनचा फ्यूएल टँक किती लीटर क्षमतेचा असतो ते? 

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार डिझेल इंजिनाचे तीन प्रकार आहेत.  रेल्वेच्या डिझेल इंजिनचे टँक प्रामुख्याने ५०००, ५५०० आणि ६००० हजार लीटर क्षमतेचे असतात. 

रेल्वेमध्ये असलेल्या मालाच्या क्षमतेनुसार रेल्वे प्रतिलितर किती एॅव्हरेज  देईल हे ठरतं.  १२ कोच असणारी प्रवासी रेल्वेचे इंजिन ६ लीटर डिझेलमध्ये १ किलोमीटर धावते. 

२४ कोच असणाऱ्या रेल्वेचे इंजिन देखील ६ लीटर डिझेलमध्ये १ किमी पर्यंत धावते.  तर १२ डब्यांची एक्सप्रेस रेल्वेचे डिझेल इंजिन हे ४.५ लीटरमध्ये १ किमी पर्यंत धावते. 

‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात फ्लर्ट करण्यात हुशार!