20 जानेवारी 2025 पासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 राष्ट्रपती होतील. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ट्रम्प हे विजयी झाले होते.
अमेरिकेचे राष्ट्रपती निवृत्त झाल्यावर त्यांना काय काय सुविधा दिल्या जातात या बद्दल तुम्हाला उत्सुकता असेल. या बाबत माहिती घेऊयात.
अमेरिकेत राष्ट्रपती निवृत्त झाल्यावर फॉर्मर प्रेसिडेंट अॅक्ट नुसार त्यांना राष्ट्र सेवेसाठी विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. सेवानिवृत्त अमेरिकी राष्ट्रपतींना वार्षिक पेन्शन दिली जाते. ही कॅबिनेट सचिवाच्या दर्जाची असते.
पेन्शनसह राष्ट्रपतीला एक सहायक, ऑफिस, आदि सुविधा दिल्या जातात. याचा सर्व खर्च हा सरकार करतं. अमेरिकेत निवृत्त राष्ट्रपतींना ऑफिस, पेन्शन, ऑफिसचं भाड तसेच स्टाफसाठी सरकारी निधी आयुष्यभर मिळतो.
अमेरिकेच्या निवृत्त राष्ट्रपतींना आयुष्यभर सीक्रेट सुरक्षा दिली जाते. या सोबतच त्यांच्या मुलांना देखील वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत सुरक्षा दिली जाते.
जर निवृत्त राष्ट्रपती परदेशात काही कामानिमित्त गेले तर त्यांच्या खर्च सुद्धा सरकार करत असतं. या सोबतच राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला देखील आयुष्यभर आरोग्य सेवा दिली जाते.
निवृत्त राष्ट्रपतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंसंस्कार केले जातात.
अमेरिकेच्या राष्ट्रपतींना खूप साऱ्या सुविधा मिळत असल्या तरी त्यांना त्यांचे घर स्वत: घ्यावे लागते. त्यांना निवासस्थानाची सुविधा पुरवली जात नाही.
माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी