शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करण्याचे लाभ काय?

By Priyanka Chetan Mali
Jan 27, 2025

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात शिवरात्रीचे खास महत्व आहे. मासिक शिवरात्री २७ जानेवारी रोजी सोमवारी आहे.

विशेषत: या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात.

यातलाच एक उपाय म्हणजे रुद्राक्षाचा आहे. शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करतात. मानले जाते की, शंकर भगवानच्या अश्रूपासून रुद्राक्ष तयार झाला आहे.

अशात शिवरात्री च्या दिवशी शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करण्याचे काय लाभ आहे ते जाणून घेऊया.

रुद्राक्षाचा वापर महादेवाच्या उपासनेसाठी केला जातो आणि यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती लाभते.

रुद्राक्षाच्या माध्यमातून मन एकाग्र होते. ज्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधनेमध्ये यश मिळते.

तुम्ही पण महादेवाची कृपा आध्यात्मिक साधनेने मिळवण्यास इच्छुक असाल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करा.

शिवलिंगावर रुद्राक्ष चढवल्यास महादेवाची कृपा प्राप्त होण्यास सुरवात होते.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS