गायीला पोळी खाऊ घातल्याने काय लाभ होतात?

By Priyanka Chetan Mali
Jan 17, 2025

Hindustan Times
Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा दिला गेला आहे आणि पूर्वापार काळापासून गायीची पूजा केली जात आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवता असतात असे मानले जाते.

यामुळेच गायीची सेवा करणे आणि गायीला पोळी खाऊ घालणे हे पुण्याचं काम मानलं जातं.

घरी पोळ्या बनवताना पहिली पोळी गायीला खाऊ घातली पाहिजे. गुरुवार आणि रविवार गायीला पोळी खाऊ घालणे अतीशय शुभ मानले जाते. जाणून घ्या यामुळे काय लाभ होतात.

मानले जाते की, गायीला रोज पोळी खाऊ घातल्याने व्यक्तिच्या जीवनात येणारे अडथळे आणि चिंता दूर होतात.

ज्योतिष मान्यतेनुसार, गायीला पोळी खाऊ घातल्याने कुंडलीत स्थित ग्रह दोष दूर होतात. रविवारी तूप लावून पेळी खाऊ घातल्याने सूर्य ग्रह मजबूत होतो.

गायीला पोळी खाऊ घातल्याने धन-धान्याची वृद्धी होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच, लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते.

गायीची सेवा केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. हे एक असे कर्म आहे जे व्यक्तिला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत बनवते.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay