एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 15, 2024

Hindustan Times
Marathi

एप्रिल महिन्याचा नवा आठवडा १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत असणार आहे. या आठवड्यात काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

एप्रिलहा हा आठवडा ५ राशींसाठी खूपच शुभ असेल, त्या ५ राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

मेश राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लकी राहील. या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. 

मेष

मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्याने तुमची कामं सहज पूर्ण होतील. तुमची संपत्ती वाढेल. पैसे कुठेतरी गुंतवले असतील तर तुम्हाला फायदा होईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला वाहन किंवा मालमत्तेचे सुख मिळेल.

वृषभ

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. 

कर्क

कोर्टात प्रकरणे चालू असतील तर तुम्हाला दिलासा मिळेल. व्यवसाय किंवा करिअरमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची योजना बनवू शकता.

धनु राशीच्या लोकांसाठी यशाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. 

धनु

या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

मीन राशीच्या लोकांचेही या आठवड्यात नशीब उजळेल. तुमच्या काही जुन्या समस्या संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा आठवडा भाग्यशाली असेल.

मीन

प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘या’ ५ गोष्टी; भगवान शिव होतील प्रसन्न!