मार्चचा दुसरा आठवडा या राशींसाठी शुभ

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 09, 2024

Hindustan Times
Marathi

मार्च महिन्याचा दुसरा आठवडा ११ मार्च ते १७ मार्चपर्यंत असणार आहे. या आठवड्यात काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

मार्च महिन्याचा नवा आठवडा ५ राशींसाठी खूपच शुभ असेल, या ५ राशींसाठी नशीब चमकणार आहे. 

मेश राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लकी राहील. या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्याने तुमची कामं सहज पूर्ण होतील. तुमची संपत्ती वाढेल. पैसे कुठेतरी गुंतवले असतील तर तुम्हाला फायदा होईल.

मेष 

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला वाहन किंवा मालमत्तेचे सुख मिळेल.

वृषभ 

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कोर्टात प्रकरणे चालू असतील तर तुम्हाला दिलासा मिळेल. व्यवसाय किंवा करिअरमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची योजना बनवू शकता.

कर्क 

धनु राशीच्या लोकांसाठी यशाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

धनु 

मीन राशीच्या लोकांचेही या आठवड्यात नशीब उजळेल. तुमच्या काही जुन्या समस्या संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा आठवडा भाग्यशाली असेल.

मीन 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान