जूनचा हा आठवडा या राशींसाठी लकी
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jun 10, 2024
Hindustan Times
Marathi
जूनचा नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. १० जून ते १६ जूनपर्यंत हा आठवडा असेल.
जूनचा हा आठवडा ५ राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या ५ राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. करिअर आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल.
कर्क
या आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम राहील. जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. जे लोक सत्तेत आहेत ते यश प्राप्त करतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्यवान असेल, या आठवड्यात नशीब तुमची साथ देईल. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
सिंह
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तणावमुक्त असेल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
कन्या
वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळू शकते. व्यवसाय वाढेल. या आठवड्यात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.
धनु राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्ही चांगली प्रगती कराल.
धनु
तुमचा वेळ आणि शक्ती योग्य ठिकाणी गुंतवून तुम्हाला फायदा होईल. सरकारकडून, सरकारी योजनेतून मदत मिळण्याची आशा आहे.
कुरकुरीत मेथीची भजी कशी बनवायची?
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा