मंगळवारी ‘या’ रंगाचे कपडे परिधान करा; बजरंगबली होतील प्रसन्न!

By Harshada Bhirvandekar
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो.  

यामुळे आठवड्याच्या दिवसानुसार वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.

मंगळवार हा हनुमानाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हनुमानजींना लाल रंग आवडतो.  

लाल वस्त्र परिधान करून दर मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने तुम्हाला नेहमी देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

या दिवशी भगवे, केशरी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे चांगले मानले जाते. 

असेही मानले जाते की, हे रंग शौर्य आणि उत्साह यांच्याशी संबंधित आहे. हे रंग परिधान केल्याने भक्तांच्या भावना  देवापर्यंत पोहोचवतात.  

लाल रंग परिधान केल्याने मनात उत्साह येतो. ज्यामुळे प्रत्येक काम आनंदाने करावेसे वाटते.  

लाल रंग हे शुभलक्षण मानले जाते. त्यामुळे विवाहित महिला देखील लाल रंग जास्त परिधान करतात.  

लाल रंगाचा संबंध ज्योतिष्यशास्त्राशीही आहे. मंगळाचा रंग ही किंचित लालसर असतो.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay