केसांच्या समस्या दूर करण्यासाठी असे वापरा 'आल्याचा रस'

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Feb 17, 2024

Hindustan Times
Marathi

केसांच्या विविध समस्यांसाठी आल्याचा रस खूप उपयुक्त आहे. कोंडा दूर करण्यासाठी, काळ्या केसांसाठी आल्याचा रस घेऊ शकता. 

pixabay

केसांच्या कोणत्याही समस्येसाठी आल्याचा रस कसा वापरावा ते पहा.

pixabay

आल्याचा रस केवळ कोंडा कमी करत नाही तर टाळूची खाज कमी करण्यासाठीही चांगला आहे.

pixabay

२ चमचे आल्याचा रस ३ चमचे तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. त्यात थोडा लिंबाचा रस घाला. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी हे मिश्रण लावा.

pixabay

केस गळतीच्या समस्येवर आले गुणकारी आहे. यात असलेले विविध प्रकारचे खनिजे, जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड केसांच्या मुळांना मजबूत करतात.

pixabay

केसांनी ओलावा गमावला तरीही आल्याचा रस त्यांना पुन्हा सुंदर दिसण्यास मदत करेल. केसांची गुणवत्ता सुधारून लांब, दाट केस येण्यासाठी आले फायदेशीर आहे. स्प्लिट एंड्सच्या दुरुस्तीसाठी देखील हे उपयुक्त आहे.

pixabay

आल्याचा रस खोबरेल तेलात मिसळा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर केसांना लावा आणि काही वेळाने शॅम्पू करा.

pixabay

आल्याचा रस केसांच्या कंडिशनिंगसाठी देखील उपयुक्त आहे.

pixabay

कांदा आणि आले बारीक करून मिश्रण सुती कापडाने गाळून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण मंद आचेवर ठेवा. नंतर हे केसांना लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी केसांना शॅम्पू करा.

pixabay

बहुप्रतिक्षित नथिंग फोन ३ बद्दल महत्त्वाची माहिती

Nothing