जीममध्ये जाण्यासाठी उत्साह वाढवणारे मार्ग

By Hiral Shriram Gawande
Aug 08, 2024

Hindustan Times
Marathi

व्यायामाचे आरोग्य फायदे सर्वांना माहीत आहेत. पण फारच कमी लोक याला त्यांच्या रुटीनचा भाग बनवतात. व्यायामाचे फायदे पाहून काही लोक व्यायाम करायला सुरुवात करतात पण काही काळानंतर ते आपले रुटीन सोडून देतात.

pixabay

जर तुम्हीही व्यायामाबाबत आळशी असाल आणि जीममध्ये न जाण्यासाठी रोज नवनवीन निमित्त शोधत असाल तर या सोप्या टिप्स तुम्हाला व्यायाम करण्यास प्रवृत्त करतील.

pixabay

जर तुम्ही थंडी, उष्णता, आर्द्रता आणि पावसामुळे वारंवार वर्कआउट चुकवत असाल तर तुमची सवय बदला. बाहेरील वातावरणाचा तुमच्या वर्कआउटवर परिणाम होऊ देऊ नका. 

pixabay

सकाळी जिममध्ये जायचे असेल तर रात्री लवकर झोपा. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने अपुरी झोप होऊ शकते. सकाळी लवकर उठता येत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीला थकवा, आळस आणि अस्वस्थ वाटू शकते. यामुळे व्यायाम करण्याबाबतचा विचार बदलू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फिटनेसवर लक्ष केंद्रित करायचे असेल तर रात्री लवकर झोपा जेणेकरून तुम्ही सकाळी जीमला जाऊ शकता.

pixabay

घराजवळच्या जिममध्ये सामील व्हा जे अनेक प्रकारचे योग आणि झुम्बा देते. या सर्व गोष्टी तुम्हाला कंटाळवाण्यापासून दूर ठेवतील आणि तुमचे मन व्यायामामध्ये गुंतवून ठेवतील.

pixabay

एकट्याने व्यायाम केल्यावर लोकांना कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे ते एक दिवस वर्कआऊट करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडून देतात. हे टाळण्यासाठी फिटनेस फ्रीक असलेल्या मित्रासोबत वर्कआउटला जा. तुमचा फिटनेस फ्रिक मित्र तुम्हाला नेहमी जीममध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करेल.

pixabay

अनेकदा सकाळचा व्यायाम संध्याकाळवर ढकलला जातो. हे टाळण्यासाठी, आपल्या व्यायामाची विशिष्ट वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या मनात त्यावेळी वर्कआउट करण्याची उर्मी निर्माण होईल.

pixabay

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर