एआय फीचर्ससह विवो एक्स २०० लॉन्च

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 12, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर विवो कंपनीची विवो एक्स २०० सीरिज भारतात लॉन्च करण्यात आली.

या सीरिजमध्ये विवो एक्स २०० आणि एक्स २०० प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.

विवो एक्स २०० सीरिजमध्ये काही अपग्रेडेड कॅमेरा फीचर्स, फ्लॅगशिप चिपसेट आणि एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

विवो एक्स २०० मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४५०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे.

विवो एक्स २०० मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

५० एमपी वाइड अँगल मेन कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ३ एक्स ऑप्टिकल झूम आणि ५० एमपी पेरिस्कोप टेलिफोटो लेन्ससह हा फोन लॉन्च झाला.

विवो एक्स २०० च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ६५ हजार ९९९ रुपये आहे. 

हा फोन येत्या १९ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा