या महिन्यांत लग्न होणार नाहीत

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 29, 2024

Hindustan Times
Marathi

ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. 

धनु आणि मीन राशीमध्ये सूर्य देवाच्या संक्रमणामुळे देवांचा गुरु असलेल्या गुरूचा प्रभाव कमजोर होतो. यामुळे ३० दिवस खरमासचा काळ असतो. 

या खरमासच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. 

सध्या सूर्य देव मीन राशीत विराजमान आहेत आणि १३ एप्रिल रोजी सुर्य मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. 

यानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना सरुवात होईल. अशा स्थितीत, एप्रिल महिन्यात लग्नाच्या शुभ तारखा आणि शुभ मुहूर्त आहेत.

पण त्यानंतर मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. कारण, ज्योतिषांच्या मते गुरु आणि शुक्र हे नक्षत्र अस्त झाल्यावर लग्न करू नये.

२२ एप्रिलपासून शुक्र अस्तामुळे मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. 

यानंतर २ जुलैपासून लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत. त्याचबरोबर चातुर्मासामुळे १६ जुलै ते १२ नोव्हेंबर या काळात लग्नाचा शुभ मुहूर्त नाही. 

मात्र, अशावेळी पंडितांचा सल्ला घेऊन आबुजा मुहूर्तावर विवाह करता येतो.

रोज एक ग्लास डाळिंबाचा रस  पिण्याचे ७ फायदे!

pixa bay