विराट कोहलीने मानले चाहत्यांचे आभार!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 26, 2024

Hindustan Times
Marathi

एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.

पहिल्या ८ पैकी ७ सामने गमावल्यानंतर आरसीबीने शेवटच्या ६ की ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

विराट कोहलीने संघाच्या विजय-पराजयाची पर्वा न करता चाहत्यांचे प्रचंड समर्थन केल्याबद्दल आभार मानले आणि इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली.

"नेहमी आमच्यावर प्रेम आणि पाठिंबा केल्याबद्दल सर्व आरसीबी चाहत्यांचे पुन्हा आभार,” कोहलीने लिहिले.

सध्याच्या स्पर्धेत विराट कोहलीने चांगली कामगिरी केली. आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप आहे.

कोहलीने आयपीएलमध्ये खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये ७४१ धावा केल्या आहेत, ज्यात ६२ चौकार आणि ३८ षटकारांचा समावेश आहे.

आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली टी२० विश्वचषक स्पर्धेची तयारी करीत आहेत.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान