विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने आजच्याच (१८ ऑगस्ट) दिवशी २००८ साली पदार्पण केले होते.
कोहलीने आपल्या करिअरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. वनडे सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला.
करिअरच्या सुरुवातीपासूनच किंग कोहलीने आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला क्रिकेटचा 'किंग' अशी पदवी मिळाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विराट कोहलीने टीम इंडियामध्ये स्वतःची स्थापना केली आणि आपले स्थान पक्के केले.
त्यानंतर हळूहळू त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जाऊ लागले. धोनीनंतर कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले.
कोहलीने २०१० मध्ये T20 आणि २०११ साली कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री केली.
टीम इंडियाने टी-20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावताच विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनलला अलविदा केला.
कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११३ कसोटी, २९५ वनडे आणि १२५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कसोटीच्या १९१ डावांमध्ये त्याने ८८४८ धावा केल्या. कोहलीने कसोटीत २९ शतके आणि ३० अर्धशतके केली, २५४* सर्वोच्च धावसंख्या आहे.
वनडेच्या २८३ डावांमध्ये त्याने १३९०६ धावा केल्या, ज्यात ५० शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये ११७ डावांमध्ये कोहलीने ४१८८ धावा केल्या, ज्यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.